
अर्जुनी मोरगाव,दि.16ःतालुक्यातील मोरगाव जंगल शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टावूâन १० आरोपींसह मुद्देमाल जप्त केला. ही घटना १२ जुलैची आहे. पोलीसांच्या धाड कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आलीअसून सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
मोरगाव जंगल शिवारात पैज लावून कोंबडा बाजार भरविला जात आहे, अशी माहिती पोलिसांना सुत्राकडून मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून बाजारावर धाड टाकली. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली.आरोपींमध्ये वामन नथु येरने (४०)रा.इटखेडा, लीलाधर आसाराम मडावी (२५) रा.अर्जुनी मोरगाव,सुनील केवळराम वलके (४२) रा.मोरगाव यांचा समावेश आहे.दरम्यान सात आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यावेळी पोलिसांनी ५ हजार १५० रूपये रोख, पाच लोखंडी काते विंâमत २५०० असा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शेवाळे, पोउपनि अवचार, पोउपनि खवस्कर तपास करीत आहेत.





