
आटपाडी दि.23:गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी, स्थावर मालमता आणि फळझाडांचे संपादन न करता, नुकसान भरपाई न देता या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेटण्याचा प्रकार चालविलेल्या ठेकेदार ,पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल निवेदना द्वारे केली आहे .
या ईमेल निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील ,सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून )अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम ) एकनाथ शिदे , कृषीमंत्री दादाजी भुसे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) दतात्रय भरणे,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री( सार्वजनिक उपक्रम ),संजय बनसोडे,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना पाठवण्यात आल्या आहेत .
गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते नागज दरम्यानच्या शेकडो शेतकऱ्यांची सुमारे दोन अडीचशे हेक्टर जमीन या रस्त्याने बाधीत झाल्याचे बोलले जाते . तसेच या महामार्गालगतच्या अनेक स्थावर मालमत्तांना झळ पोहचलीच शिवाय रस्त्यात येणाऱ्या शेताकडेच्या शेकडो फळ झाडाना विना पंचनामा नेस्तनाबूत करण्यात आले . या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वीच रस्त्याने बाधीत होणाऱ्या स्थावर मिळकती , फळझाडांचे, फळबागांचे शेतजमिनींचे रितसर संपादन करणे गरजेचे होते तथापि गेली दोन वर्षे बाधीत शेतकरी, नागरीक , संघटना याबाबत दाद मागत असून ही निर्ढावलेली शासन व्यवस्था आणि संबधीत ठेकेदार याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आले आहेत




