
गोंदिया,दि.02ः-गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या शास्त्रीवार्ड भागात व गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत येणार्या ढिमरटोली येेथे ईदच्या दिवशी दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.भंडारा तुरुगांतून सुटून आलेला संजयनगर निवासी इमरान रशीद खान( वय 20)हा रात्री नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या मित्रासोंबत बसलेला असताना अचानक आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी तेज धारदार हत्यारांनी हत्या केली.यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक नार्वेकर व सावंत यांनी पोलिसांचा ताफ्यासह घटनास्थळी पोचत जमावाला पांगवले.त्यादरम्यान आरोपी फरार झालेले होते.तर दुसरी घटना गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत ढिमरटोली येथे घडली. गुटखा खाण्याच्या वादातून विकास कटरे याच्याशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उमेश मेश्राम याने वाद घालून तीक्ष्ण धारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले.जखमी अवस्थेत त्यास गोंदिया हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाला.





