37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार 5 व 6 ऑगस्टला तरुणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

5 व 6 ऑगस्टला तरुणांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
491

गोंदिया, दि.3 : लॉकडाऊनमधील शिथिलीकरण सुरु झालेल्या उद्योग व्यवसायांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी व जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गोंदिया कार्यालयातर्फे 5 व 6 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा घेण्यात येत आहे.

कोरोना साथीच्या देशभरातील लॉकडाऊनमुळे असंख्य कामगारांचे स्थलांतर झाले. शिथिलीकरणानंतर काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक कंपन्यांना मनुष्यबळाची कमतरता भासते. त्यामुळे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गोंदियातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्स व इतर डिजीटल माध्यमातून मुलाखती घेण्यात येतील. स्थानिक स्तरावर उद्योग व्यवसायांची भरभराट व रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांनाच ऑनलाईन रोजगार मेळाव्यात नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गोंदिया यांनी कळविले आहे.

blank