
गोंदिया, दि.5 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त वतीने 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील युवकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये प्रवेश घेतांना कशाप्रकारे काळजी घेण्यात यावी याबाबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथील गटनिदेशक एस.एम.गौरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/hgq-krzq-pdx या लिंकवर क्लिक करण्यात यावे. या ऑनलाईन सत्राचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.स.रिसे यांनी केले आहे.




