
गोंदिया,दि.12- सालेकसा तालुक्यातील धनेगांव ते मुरकुटडोह या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भुसुरंगस्पोट घडवून आणण्यासाठी पेरुन ठेवलेले साहित्य निकामी करुन पोलिसांना नक्षल्यांचा बेत हाणून पाडला.या मार्गावर जीवे मारण्याच्या उद्देशाने स्फोटके पेरुन ठेवल्याची माहिती गुप्त माहिती नक्षल ऑपरेशन सेल विभागाला मिळताच पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वात 11 आॅगस्टरोजी शोध मोहिम राबविण्यात आली. सी-60 सालेकसा येथील 2 कमांडो पथक, बी. डी. डी. एस. पथक, नक्षल ऑपरेशन सेल गोंदिया व पोलीस ठाणे, सालेकसा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी धनेगाव ते मुरकुटडोह या रस्त्यावर सर्चिंग ऑपरेशन राबवले.दरम्यान मौजा दलदलकुही स्प्रिंग पॉइंटच्या जवळ संशयास्पद वस्तू आढळून आल्याने बी.डी.डी.एस.पथकाच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान स्पोटक साहित्य(आईडी) पेरुन ठेवल्याचे दिसून आले.पथकाने स्पोटक निकामी करुन बाहेर काढले असता त्यामध्ये सिल्वर रंगाचा ॲल्युमिनियम बेस एक्सप्लोझिव्ह, इलेक्ट्रिक डेटोनेटर, जर्मन डब्बा कंटेनर अंदाजे पाच ते सहा किलो, स्पिलंटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी असे स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी पेरुन ठेवल्याचे आढळून आले. सदर साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सालेकसा पोलिस करत आहेत.





