
धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा. आपला धुळे जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरील आणि सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला जिल्हा होय. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी, पांझरा, कान, बुराई, बोरी
धुळे जिल्ह्यातील कापूस हे नगदी पीक सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. त्याची २ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेली आहे, तर मका या पिकाची ५४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात लागवड झालेली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रासायनिक खते पोहोचविण्याची योजना राबविण्यात आली होती.
खरीप हंगाम २०१९ मध्ये ७८ हजार शेतकऱ्यांनी ७० हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतलेला होता. त्यापैकी ६६ हजार ७० शे
गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धुळे जिल्ह्यात कापसाचे भरघोस पीक आले. विशेष म्हणजे राज्य शासनाने हमी भावाने सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतरही राज्य शासनाने कापसाची खरेदी केली आहे. धुळे जिल्ह्यातील १४ हजार ३५२ शेतकऱ्
गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित २ लाख ७८ हजार १६७ शेतकऱ्
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना शिवभोजनाचा आधार मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील ही योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. आपल्या धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २ लाख २० हजार गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. शिवभोजनाची थाळी सध्या पाच रुपयांना मिळत आहे. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य तसेच प्रती कार्ड एक किलो तूरडाळ किंवा चनाडाळ प्रती कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने खासकरून एपीएल (केशरी) कार्ड धारकांना सवलतीच्या दरात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून माहे एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत २५ हजार ४८३ टन गहू, ३९ हजार ७८ टन तांदूळ, ८२८ टन डाळीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्य शासनाने आत्मनिर्भर योजनेंतर्गत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, असे नागरिक, स्थलांतरित, बेघर मजुरांना प्रती व्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना १ लाख ७९ हजार २२३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असूनही शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे यातून दिसून येते.
गेल्या मार्च २०२० पासून संपूर्ण मानवाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, नगरविकास शाखा, पोलीस अधीक्षकांसह महसूल विभागास ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात राज्य आपत्ती निवारण निधी, गौण खनिज निधी आणि जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांचीही चांगली साथ मिळत आहे. आता एकच लक्ष्य आहे ते म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तसेच कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात माध्यमांचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. त्यांनी वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम केले आहे. ते सुद्धा कोरोना योद्धेच आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखतानाच दैनंदिन जनजीवन सुरळीत व्हावे म्हणून राज्य शासनाने ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून दैनंदिन जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. तसेच आगामी काळात संपूर्ण जनजीवन सुरळीत होईल, असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हावासियांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे. बाहेर जाताना मास्कचा वापर करावा म्हणजे करावाच. माझी धुळेकरांना एवढीच विनंती कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.





