चंद्रपूर ,दि.२१:: जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल आरोग्य मिशनमध्ये कार्यरत 32 वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. मृतकाचे नाव डॉ. सुनील टेकाम असे आहे. ते मुळचे मु. पो. राजुरा येथील रहिवासी होते. कोविड -19 मध्ये कर्तव्यावर असताना कोविड -19 ची बाधा ७ ऑगस्ट रोजी झाली होती.उपचार सुरू असताना आज 21/8/2020 रोजी मृ्त्यू त्यांचा झाला. डॉ. टेकाम यानी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती येथून यांनी पदवी घेतली होती. 2 वर्षाची छोटी मुलगी सुद्धा आहे. पालकमंत्री विजय वड्डेटीवार व जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी शोक संवेदना व्य़क्त केल्या.





