
गोंदिया: येथील एक्युट पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी रियांशा शहारेची इंसापर स्कॉलरशीपकरिता निवड झालेली आहे. रियांशा ने मार्च २०२० च्या इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेत विद्यालयातून प्रथम आली आहे. सदर विद्यार्थिनीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व विभागीय मंडळ नागपूरच्यावतीने इंसपायर योजनेंतर्गत पुढील उच्च शिक्षणासाठी ८० हजार रुपये स्कॉलरशीप मंजूर करण्यात आली आहे. भारतातील कुठल्याही विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी ही स्कॉलरशीप मंजूर झाली असून पदवीचे शिक्षण होईपर्यंत स्कॉलरशीप मिळणार आहे. स्कॉलरशीपकरिता निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक प्राचार्य तसेच शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.