42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा जिल्ह्यात फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन

जिल्ह्यात फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन

0
64

गोंदिया,दि.26 : युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ हा नविन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. केंद्र शासनाच्या पत्रान्वये व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया व संपूर्ण जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ‘फिट इंडिया फ्रिडम रन’चे व्यापक स्वरुपात आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमामागील संकल्पना अशी आहे की, तुम्ही कोठेही, कधीही पळू/चालू शकता ही असून धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र आहे. नेहमी तंदुरुस्तीकरीता व्यायामाची आवश्यकता आहे. लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता इत्यादी आजारापासून मुक्त होण्यासाठी ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ ही चळवळ राबविण्यात येत आहे. ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी पुढीलप्रमाणे ऑनलाईन कार्यवाही करावी. गुगल क्रोमवर ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ या वेबसाईटवर संघटक म्हणून रजिस्टर करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिक/खेळाडू महिला/पुरुष इत्यादी सर्वांनी आपली वैयक्तिक माहिती म्हणजे स्वत: धावल्याची माहिती संबंधितांनी सदर विंडोजमध्ये नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, धावण्याची तारीख, अंतर, राज्य जिल्हा, गट/ब्लॉक तसेच अंतर धावलेली/चाललेली माहिती त्यांचे ॲपवरुन सदर टेबलमधून अपलोड करायची आहे. उपरोक्त डेटा स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलद्वारे किंवा इतर ॲपद्वारे अपलोड करावा. वरील माहिती अपलोड केले असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई-मेलद्वारे प्राप्त होणार आहे.
सहभागी झालेल्या व्यक्तींनी धावलेले/चाललेले अंतर/मॅरेथान फिड इंडिया पोर्टलवर www-fitindia.gov.in यावर नोंद करावी. 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात 29 ऑगस्ट पासून ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सर्व जिल्ह्यामध्ये ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ ही चळवळ राबविण्यात येत असून या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व जनतेकरीता www-fitindia.gov.in ही लिंक देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.

blank