गृहभेट व आनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंना शिक्षक देतायेत धडे

0
262
सितेपारच्या छत्रपती विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतांना

आमगाव,दि.26ः- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांच्या दारी भेटी देऊन समस्या सोडवित आहे. गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन व आॅनलाईनच्या माध्यमातून शिक्षकांनी अध्यापन कार्य सुरु केले आहे.मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदा ऑगस्ट महिना येऊनही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शिक्षण विभागाने शिक्षकांच्या गृहभेटी करण्याचे पत्रकाढले होते. परंतु या पत्रावरून काही शिक्षक संघटनांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या गृहभेटी ह्या कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत असल्याची टिका केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

परशुराम विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतांना

परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत चार पाच विद्यार्थ्यांना एकत्र आणत शिक्षणाचे धडे द्यायला सुरवात केले आहे.15 आॅगस्टपासून जिल्ह्यातील सर्वच माध्यमिक शाळा दुपारपाळीच्या सुरु झाल्या असून दुपारपर्यंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन नियमित शिक्षणाला सुरवात झाली आहे,ज्यांच्याकडे मोबाईलची सोय नाही अशा विद्यार्थ्यासांठी.शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद वर्ग १ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित क्लास घेत आहे. कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्या तरी अनेक विद्यार्थी विविध माध्यमातून ज्ञानार्जन करीत आहेत. मात्र यामुळे शिक्षकांच्या आरोग्यालाही धोका एकप्रकारचा निर्माण झालेला आहे.