38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा जिल्ह्यात २९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर पर्यंत‘फिट इंडिया फ्रीडम रन’चे आयोजन

जिल्ह्यात २९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर पर्यंत‘फिट इंडिया फ्रीडम रन’चे आयोजन

0
167

blank

वाशिम, दि. २७ (जिमाका) : युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेवून ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ या नविन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यात २९ ऑगस्ट २०२० ते २ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे ‘फिट इंडिया’ अंतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ ही चळवळ २९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२० या कालावधीत सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामागील संकल्पना अशी आहे की, तुम्ही कोठेही, कधीही पळू, चालु शकता. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तिशः अनुकुल वेळ निवडू शकतात. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे, चालणे करु शकणार आहेत. प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणे, चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग अॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा वेळ व अंतराचा मागोवा घेता येणार आहे.

सहभागी झालेल्या व्यक्तींनी धावलेले अंतर, मॅरेथॉन याची ‘फिट इंडिया’ (www.fitindia.gov.in) या पोर्टलवर नोंद करावी. सहभागी होणाऱ्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखण्याच्या निकषानुसार २९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२० या कालावधीत धावणे व चालण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हयात 14 सप्टेंबरपर्यंत फिट इंडिया कार्यक्रमाचे आयोजन 

 भंडारा, दि. 27 : – 15 ऑगस्ट 2020 रोजी युवा आणि खेळ मंत्रालयांतर्गत केंद्रीयमंत्री तथा स्वतंत्र प्रभार युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या हस्ते फिट इंडिया युथ क्लबचे ऑनलाईन वेबकास्टद्वारे उदघाटन करण्यात आले आहे. फिट इंडिया कार्यक्रमाद्वारे संपूर्ण भारत वर्षात शारिरिक आणि मानसिक स्वास्थ संतूलित राखण्यासाठी विविध व्यायामावर आधारित जनजागृती करण्यात येत आहे. जसे एकल अथवा सामुहिक जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, डांसिंग, ट्रेडिशन गेम्स, कराटे, खो-खो,  कबड्डी या सारखे व्यायाम करण्याचे आयोजन करण्यात येत आहेत. नेहरु युवा केंद्र भडाराद्वारे ग्रामीण क्षेत्रातील विविध युवक मंडळाचा सहभाग या कार्यक्रमात असून कोविड-19 च्या मार्गदर्शिकानुसार सुरक्षित अंतराचे पालन करीत युवकांनी हा सहभाग दर्शविला आहे. फिट इंडिया कार्यक्रमाचे नियोजन 14 सप्टेंबर 2020 पर्यंत करण्यात आले आहे.

blank