40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ दोन बाधित रुग्णांचा मृत्यु;26 पॉझिटिव्ह रुग्ण

दोन बाधित रुग्णांचा मृत्यु;26 पॉझिटिव्ह रुग्ण

0
1827

गोंदिया दि. 30 (जिमाका) : सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढतांना दिसत आहे.आज जिल्ह्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर उपचारातून 45 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

आज आढळून आलेल्या 26 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 1393 वर पोहचली आहे.आज जे रुग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये गोंदिया तालुक्यात 15 रुग्ण असून यामध्ये देशबंधू वार्ड सहा रुग्ण, रिंगरोड, शास्त्री वार्ड, श्रीनगर, गांधी चौक,कुडवा,न्यू लक्ष्मी नगर व कन्हारटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण व दोन रुग्ण गोंदिया येथील इतरत्र भागातील आहे.

तिरोडा येथील शहीद मिश्रा वार्ड व संत सज्जन वार्ड येथील प्रत्येकी एक रुग्ण, गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव व गोरेगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण, आमगाव तालुक्यातील बिरसी,लांजी रोड आमगाव व चिरचाळबांध येथील प्रत्येकी एक रुग्ण,अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील दिनकर नगर येथील दोन रुग्ण, बाहेर राज्य व जिल्ह्यातील मध्यप्रदेशातील बालाघाट व भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.अशा एकूण 26 रुग्णांचा समावेश आहे

दोन कोरोना बाधित रुग्णांचा काल आणि आज मृत्यू झाला. 29 ऑगस्टला ज्या रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला तो 72 वर्षीय रुग्ण आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील आहे.आज ज्या 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला तो आमगाव येथील रहिवासी आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.गोंदिया तालुका- 8 रुग्ण, तिरोडा तालुका -7 रुग्ण, आमगाव तालुका-3 रुग्ण आणि एक रुग्ण सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.

कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता आहे अशांची विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येते.आजपर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून 1124 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 325 नमुने असे एकूण 1449 नमुने पॉझिटिव्ह आढळले.

आज जे 26 कोरोना बाधित आढळून आले.सर्वाधिक 15 रुग्ण हे गोंदिया शहर व तालुक्यातील आहे.बाधित आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -692,तिरोडा तालुका-301, गोरेगाव तालुका -39, आमगाव तालुका -90, सालेकसा तालुका-44, देवरी तालुका -48, सडक/अर्जुनी तालुका -68, अर्जुनी /मोरगाव तालुका – 91 आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -20 रुग्ण आहे, असे एकूण 1393 रुग्ण बाधित आढळले आहे.

आजपर्यंत 920 रुग्णांनी कोरोनावर मात केली.यामध्ये गोंदिया तालुका- 373, तिरोडा तालुका -255, गोरेगाव तालुका -33, आमगाव तालुका -54, सालेकसा तालुका -38, देवरी तालुका-41, सडक/अर्जुनी तालुका – 53, अर्जुनी/मोरगाव तालुका -79 आणि इतर -4 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण 454 आहे. तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 321,तिरोडा तालुका-39, गोरेगाव तालुका-6, आमगाव तालुका -33, सालेकसा तालुका-6,देवरी तालुका-8, सडक/अर्जुनी तालुका -14, अर्जुनी/मोरगाव तालुका -12 आणि इतर – 16 असे एकूण 454 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी 443 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात आणि 11 रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहे.

क्रियाशील रुग्णांपैकी 45 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका – 22, तिरोडा तालुका-08,गोरेगाव तालुका -00,आमगाव तालुका–10, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका – 00, सडक/अर्जुनी तालुका -15, अर्जुनी/मोरगाव तालुका -16 असे एकूण 45 क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

कोरोनावर आज मात केलेल्या रुग्णांची संख्या 45 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -35, तिरोडा तालुका -9, गोरेगाव तालुका -00, आमगाव तालुका-00, सालेकसा-00,देवरी तालुका-01, सडक/अर्जुनी तालुका- 00 आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील 00 रुग्ण आहे. आतापर्यंत 920 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 16405 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 14361 नमुने निगेटिव्ह आले. तर 1124 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 454 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 465 नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 29 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 789 व्यक्ती अशा एकूण 818 व्यक्ती विलगिकरणात आहेत.

कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत 10590 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 10265 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 325 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 59 चमू आणि 46 सुपरवायझर 50 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका -05, आमगाव तालुका -08, सालेकसा तालुका -05, गोरेगाव तालुका -04, देवरी तालुका-05, सडक/अर्जुनी-06, तिरोडा तालुका- 16 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-1असे एकूण 50 कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात आहे.