
तिरोडा,दि.02ः- भारतीय जनता युवा मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षपदी भाजयुमोचे उपाध्यक्ष ओम कटरे यांची नियुक्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केली आहे.ओम कटरे हे तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील रहिवासी असून भाजपमध्ये ते 2005 पासून सक्रिया आहेत.बजरंग दल कार्यकर्ता,तालुका विस्तारक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे.राजकीय पृष्टभूमि नसून फक्त एक धडाडीचा आणि सामान्याची नाळ जपणारा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याने भारतीय जनता पक्ष विषयी समान्य माणसाची निष्ठा वाढेल अशी ग्वाही दिली आहे.आपल्या नियुक्तिचे श्रेय भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस,उपेंद्र कोठेकर ,खासदार सुनील मेंढे ,विजय राहंगडाले, वीरेंद्र अंजनकर,परिणय फुके,जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर ,हेमंत पटले भजनदास वैद्य गुरुजी, मदन पटले, पंकज राहंगडाले यांना दिले आहे.




