40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता पैसे वसुल करुन न दिल्याच्या कारणावरुन नक्षल्यांनी केली एकाची हत्या

पैसे वसुल करुन न दिल्याच्या कारणावरुन नक्षल्यांनी केली एकाची हत्या

0
461
file photo

blank

गडचिरोली,दि.02ः-गडचिरोली पोलीस ऊपविभागा अंतर्गत येणार्या पोमकें पोटेगाव हद्दीतील मौजा नागवेली येथील सखाराम डागडु नरोटे(वय 33)याची 1 सप्टेंबरच्या रात्रीला 20 ते 25 बंदुकधारी नक्षलवाद्यांनी घरी जावुन त्याला व त्याचा भाऊ शामराव अलसु नरोटेला घेवुन जाऊन मारहाण केली.त्यानंतर शामराव नरोटेस गावात सोडून दिले.तर सखाराम नरोटेस जवळच असलेल्या हलामीटोला परिसरात नेऊन येडमपायली ते हलामीटोला रस्ता बांधकाम ठेकेदाराकडून पैसे वसुल करुन नक्षलवादी पार्टीला दिले नाही या कारणावरुन बंदुकीची गोळी झाडुन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सखाराम झगडु नरोटे याची सन 2015 पासून नक्षल समर्थक म्हणन कार्यरत असल्याची पोलीस दप्तरी नोंद असुन तो नक्षलवाद्यांना मदत करीत होता असे म्हटले आहे.
गडचिरोली जिल्हा गेल्या 40 वर्षापासुन नक्षलग्रस्त असुन, नक्षलवाद्यांचा पाया असलेल्या एआरडी/जिआरडी/जन मिलीशिया सुध्दा नक्षलवाद्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत.नक्षलवाद्यांनी आजपावेतो ५३५ पैकी काही सामान्य नागरिकांचा, पोलीसांचे बातमीदार असल्याचे संशय घेवून तसेच नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या नक्षल समर्थकांचा त्यांचे वैयक्तीक वाद व पैश्याच्या वादावरुन खुन केला असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

blank