
भंडारा,दि.04ः-राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आज भंडारा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे फटका बसलेल्या गावांची पाहणी करीत नागरिकांशी सवांद साधला.सोबतच राज्य सरकार पुरग्रस्त नागरिकाना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.खासदार पटेल यांनी लोहारा, पेवठा, सालेबर्डी,पिंडकेपार, गणेशपुर या पुरग्रस्त गावांना भेंट दिली. भेटी दरम्यान पुरग्रस्तांशी संवाद साधुन पुरामुळे झालेल्या नुकसानी विषयी चर्चा केली. पुरामुळे भात पिकासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोकांचे घरांचे सुध्दा नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. शासनच्या वतीने नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी या साठी शासनस्तरावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले. खा. पटेल यांच्या सोबत आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे,माजी खासदार मधुकर कुकडे,धनंजय दलाल,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,सुमेध श्यामकुंवर,यशवंत सोनकुसरे,जया सोनकुसरे आदी उपस्थित होते.




