
पंढरपूर,दि.05 -पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून फिर्याद देण्यासाठी जाणाऱ्या फिर्यादीस व त्याच्या मुलावर धारदार कोयत्याने हल्ला करीत फिर्यादीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना देगाव ता. पंढरपूर येथे 4 सप्टंबेर रोजी सकाळी 11 वाजता घडली आहे
याबाबत सतीश उर्फ बाळू हरी पवार, (वय 30 वर्ष, राहणार :बाभळगाव तालुका: पंढरपूर, जिल्हा: सोलापूर) यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.पोलिसांनी आरोपी लाला बबन शिंदे रा.बाबळगाव ता.पंढरपूर ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,बाभूळगाव येथिल हरी पवार व सतिश पवार हे पाठीमागील भांडणाबाबत फिर्याद देण्यासाठी पंढरपूरला येण्याची तयारी करत असताना 4 सप्टेंबर रोजी 09:30 व 11:00 वाजताचे सुमारास मौजे देगाव ता.पंढरपूर गावचे शिवारातील गणेश गांडुळे यांच्या शेताजवळ फिर्यादी व त्याचे आई-वडील शेतातील घरी असताना यातील आरोपी लाला बबन शिंदे रा. बाभुळगाव यांनी पूर्वी दिलेल्या(2016) तक्रारीच्या कारणावरून भांडण काढून फिर्यादीचे वडील हरी यांना” हऱ्या तुला आज ठेवत नाही” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या हातातील दगड व शेजारी पडलेले दगड उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकून मारले. त्यात फिर्यादीच्या उजव्या हाताचे खांद्यावर व पोटावर जखम झाली. त्याबाबत फिर्यादी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ला त्याच्या वडिलांसोबत तक्रार देणे करता मोटरसायकलवरून येत असताना आरोपी लाला शिंदे यांनी देगावच्या शिवारातील गणेश गांडुळे यांच्या शेताजवळ 11:00 वाजताच्या सु. मोटरसायकलला त्याची मोटरसायकल आडवी लावून कोयता घेऊन “हाऱ्या तुला आता जित्ता सोडत नाही “असे म्हणून हातातील कोयत्याने फिर्यादी चे वडील हरी पवार यांच्यावर कोयत्याने वार करून व लाथांनी मारून जीवे ठार मारले. व फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. खरात हे करीत आहेत





