पळालेल्या आरोपीचा दोन दिवसात लावला शोध

0
406

देवरीः- चिचगड टि-पार्इंट देवरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पळालेल्या आरोपींचे शोध जिल्हा पोलिसांनी २ दिवसात लावून ५ आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. १० सप्टेंबर रोजी कलम २७९, ३०४, ३३८, ४२७ भादंवि, ११ (१)(ड) प्राणी छळ प्रतिबंधात्मक कायद्यान्वये पोलिस स्टेशन देवरी येथे अज्ञात आरोपींताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी पोलिस अधिक्षक यांचे सुरचेनुसार देवरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, शिपाई लाडगे व भांडारकर यांचे तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने छत्तीसगड येथील रायपूरला जावून माहिती काढली असता सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नागपूर कडून रायपूरकडे एका चारचाकी वाहनाने जात असल्याची खात्रीशी माहिती मिळाली. या माहितीवरून चिचगड टि-पार्इंट देवरी येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक कदम, पोलिस शिपाई काटकर, डोहळे यांचे मदतीने नाकाबंदी करून वाहन चालविणाèया व्य्नतींना विचारपूस केली असता संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून देवरी पोलिस स्टेशनला आणले.

सदर इसमांकडे चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्यातील अवैध जनावरे वाहतूक करणारे आणखी आरोपी असल्याबाबद चौकशीत निष्पन्न झाले. सपोनि कमलेश बच्छाव, शिपाई लांडगे, भांडारकर, राऊत, काटकर, डोहळे यांचे सहीत स्थानिय गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गर्जे व त्यांचे कर्मचारी यांनी आरोपींचा शोध घेवून बजारीनगर मस्जिद रायपूर येथील रहिवासी आरीफ हुसेन मुबारक हुसेन (२७), गाजीनगर बिरगाव रायपूर येथील रहिवासी नशीरूद्दीन बशीरूद्दीन (४६), अबरार अहमद कदिर अहमद (४५), बापूटोला तहसिल सुर्या येथील रहिवासी श्रावणकुमार बाबूलाल लावूतरे (२५) व लालूटोला तहसिल छुरिया छत्तीसगड येथील केवलराम शत्रूघ्नकुमार कंवर (२९) यांना ताब्यात घेतले.