नदीत उड्या घेतलेल्या ९ जुगार्‍यांना अटक

0
666

गोंदिया,दि.16ः पोलिसांना पाहता जुगार अड्डयाच्या शेजारील जंगलात पळून जाणार्‍या तसेच नदी उडी घेणारा ९ जणांना अटक करुन त्यांच्याजवळून ६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नवरगाव शिवारात केली.
तालुक्यातील नवरगाव नदी परिसरात अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा पथकाने सायंकाळी जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी पोलिसांना पाहताच काही जणांनी जंगलात पळ काढला तर काही जणांनी नदीत उड्या घेतल्या. पोलिसांनी जंगलात पळणार्‍यांचा पाठलाग करुन तसेच नदीत उड्या घेतलेल्यांना नदीतून काढून एकूण ९ जणांना ताब्यात घेतले. यात कमलेश सुरेंद्र बंसोड रा.टेमणी, कोहीनूर छगनलाल वासनिक रा.गुदमा, काजू अनंतराम हुकरे, गुदमा, सतीश तेजराम मेंढे रा.सुपलीपार, रितेश अरुण बोरकर रा.संजयनगर, अजय जुगलकिशोर सोनकर रा.शास्त्री वॉर्ड, प्रविण अशोक आंबेडारे रा. फुलचूर यांचा समावेश आहे. या कारवाई पोलिसांनी २२ हजार २४0 रोख रक्कम, ७ मोबाईल फोन, ९ दुचाकी असा एकूण ६ लाख ४ हजार २९0 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला.
आरोपींवर ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, पोलिस कर्मचारी लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत कर्पे, विजय रहांगडाले, भुवनलल देशमुख, भुमेश्‍वर जगनाडे, रेखलाल गौतम, दिनेश लोधी, प्रविण चामट, संतोष चव्हाण, रुपराम पटले, शशीकांत भेंडारकर, संजय हुड, विनोद हरिणखेडे यांनी केली.