सडक-अर्जुनी: तालुक्यातील लेंडेझरी येथील संरक्षित वन वंफ्पार्टमेंट नं. ६८२ मध्ये रानडुक्करची शिकार करून त्याचा मास खाणाछया ५ आरोपींना वन विभागाने कारवाई करून ताब्यात घेतल्याची घटना (ता.२१) घडली. सडक अर्जुनी तालुक्यातील लेंडेझरी हा परिसर जंगल व्याप्त असून कम्पार्टमेंट नं. ६८२ मध्ये रानडुक्करची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्या आधारे वन्यजीव विभाग प्रादेशिक सहवन विभागाच्या अधिकाèयांनी शोध मोहिम सुरू केली. गश्ती पथकाला लेंडेझरी गावातील सुभाष मंगरु गहाणे याच्या घरी रानडुकराचे मास आढळून आले.
अधिक शोध मोहिम राबविली असता गहाणे याने या प्रकरणात इतर ४ व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगितले. यामध्ये गहाणे यांच्यासह शिवदास कापगते, ओमप्रकार मसराम, प्रशांत वरखडे, नरेंद्र कापगते सर्व रा. लेंडेझरी यांना ताब्यात घेऊन यांची चौकशी केली असता या सर्वांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. या सर्वांना (ता.२२) न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अवगान, क्षेत्र सहाय्यक उके, वनरक्षक सोनवाने, एटड्ढे तसेच प्रादेशिक सहवनरक्षक प्रदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी. पंचभाई, क्षेत्र सहाय्यक एस.झेड. वलथरे, स्वप्नील डोंगरे, आनंद बंसोड, दीपक बोदलकर, सिशोदे, वनमजूर रवि वैद्य, माणिकराम टेकाम, विजय पुस्तोडे, रमेश मेश्राम, वामन धुर्वे, भोजु पटले आदींनी पार पाडली.