२ कोटींचा सुंगधित तंबाखू घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

0
555

गोंदिया, दि.24 :चिचगड मार्गाने सुंगधित तंबाखू व गुटखा पाऊच घेवून जाणारा ट्रक अडविण्यात आले. ट्रकमध्ये जवळपास २ कोटी ११ लाख रूपयांचा माल असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात ट्रक चालकाच्या चुकीने महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती संबधित ट्रक मालकाने दिली आहे. महाराष्ट्रात सुंगधित तंबाखु व प्रतिबंध लावण्यात आल्याने कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई २१ सप्टेंबरच्या रात्री चिचगड पोलिस ठाण्यातंर्गत करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचे क्रमांक एचआर-४६/पी-५७११ असे आहे.
विशेष म्हणजे वाहन चालकाकडे सदर माल वाहतुकीच्या संदर्भात सर्व बिले उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्यात दाखल न होता छत्तीसगढ व आंध्रप्रदेश या राज्याच्या मार्गाने त्या वाहनाला प्रवास करायचा होते, असे ट्रक मालकाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या अखत्यारित देण्यात आले आहे.