अर्जुनी मोरगाव,दि.26 :–अर्जुनी मोरगाव वडसा मार्गावर ईटखेडा टीपॉईंट जवळ अवैध जनावरे वाहतूक करणारा पिकअप अर्जुनी-मोर पोलिसांनी पकडून दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबरला सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अर्जुनी-मोर वडसा व महागाव ईटखेडा जाणाऱ्या डांबरी रोड t-point येथुन अवैद्य जनावरे खाजगी वाहनातून जात असल्याचे माहित होताच पोलिसांनी सापळा रचून अशोक लेलँड कंपनीचे पिकप mh40 बि.जी.7884 या वाहनाला अडविले.त्या वाहनात लालसर रंगाचे सात ,एक पांढरा रंगाचा असे एकूण आठ लहान-मोठे जनावर प्रती नग सात हजार प्रमाणे 56 हजार रुपये व अशोक लेलँड कंपनीची पिकप गाडी अंदाजे किंमत दोन लक्ष असा एकूण दोन लक्ष 56 हजार रुपयाचा माल पंचांसमक्ष मोकाजप्ती पंचनामा करुन जप्त करून केला. सदर जनावराच्या देखभाल करण्याकरिता खाजगी चालकासह एका वाहनातून सदर जनावरे सुकृत गोशाला खैरी तालुका लाखनी येथे दाखल करण्यात आले. फिर्यादी पोलीस नायक विजय कोटांगले यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोर पोलिसांनी पिकअप चालक स्वरूप राजकुमार मोटघरे (वय 37,धाबेटेकडी) त्याचे सोबत गाडीमध्ये असलेला क्लिनर संदीप दयाराम जांभुळकर (वय 31,धाबेटेकडी) यांचे विरुद्ध 257/ 2020 कलम 11 (1)( ड)प्रा.नि.वा.कायदा सन 1960 सहकलम 6,9 म.प.सं,अधिनियम 2015सहकलम 34 भादंवि सहकलम 83/177 मो.वा.का.अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा तपास पो.नि.महादेव तोदले यांचे मार्गदर्शनात नापोशि प्रविन बोहरे करीत आहेत.