जिल्हा परिषद शिक्षकाची आत्महत्या

0
242

ब्रम्हपुरी, –तालुक्यातील मेंडकी केंद्रांतर्गत येणार्‍या गणेशपूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत विलास दहिवले या शिक्षकाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवार, 21 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.
मृतक शिक्षक ब्रम्हपुरी येथील गणवीर रूग्णालयालगतच्या शिवम सदनिकेमध्ये राहत होता. वृत्तलिहिस्तोवर त्यांनी आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. मृताच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. या घटनेने ब्रम्हपुरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.