वाहन चोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून डुग्गीपार पोलिसांनी पकडले

0
133

कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):-नागपूर येथून चोरी केलेली टाटा नॅक्सन गाडीने ट्राफिक पोलिसांचे अपघात करून पसार झालेल्या आरोपीस वाहनासह डुग्गीपार पोलिसांनी नाकाबंदी व पाठलाग करून पकडले.नागपूर येथे ट्राफिक पोलीस अमलदार यास धडक देऊन टाटा नॅक्सन विना नंबरचे वाहन पसार झाल्याची माहिती विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचेकडून डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांना प्राप्त होताच तात्काळ कोहमारा चौक येथे स्टॉप सह नाकाबंदी लावून वाहने चेक करतांनी रायपूर कडून संशयित वाहन कोहमारा चौक येथे आले व समोर पोलीस नाकाबंदी करीत असल्याचे पाहून संशयित वाहन चालक यांनी यु टर्न घेऊन देवरी कडे पसार झाल्याचे लक्षात येताच नाकाबंदी पाईट वरून पोलिस निरीक्षक सचिन वांगडे व पोलीस नाईक झुमन वाढई यांनी खाजगी वाहन थांबवून त्या वाहनाने त्यांच्या पाठलाग केला असता संशयित आरोपी हा बाम्हणी /खडकी गावाबाहेर रोडवर गाडी थांबवून जंगलाच्या दिशेने पळत असता त्याच्या पाठलाग करून चालक संदेश सिद्धार्थ भोईर वय 37 वर्षे राहणार शताब्दी नगर अजनी नागपूर व चोरीची टाटा नॅक्सन गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे घेऊन आले व नागपूर पोलिसांना पुढील कारवाई करणे करिता माहिती दिली.
सदर कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे ठाणेदार ,, हवालदार हरिसश्चंद्र शेंडे, पोलीस हवालदार जगदेश्वर बीसेन, पोलीस हवालदार रमेश हलामी, पोलीस नाईक झुमन वाढई, पोलीस शिपाई घनश्याम मुळे यांनी केली आहे.