औरंगाबाद, दि.24 मार्च- वाळूच्या ठेकेदाराकडून दिड लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अपर तहसीलदार किशोर देशमुख यांना अटक झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार वाळुचा ठेकेदार आहे. शहरात रेतीची वाहतूक करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराला 10 मार्च रोजी हायला सोडण्यासाठी 4 लाख 70 हजार रुपयाची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. रेतीची हायवा ट्रकने वाहतूक करण्यासाठी तात्काळ दिड लाख रुपयाची मागणी केली. लाच घेताना सोमवारी रात्री अपर तहसीलदार किशोर देशमुख यांना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी पकडलेल्या वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या ख-या कि खोटे याचा अहवाल देण्यासाठी तसेच सहा हायवा वाळुची वाहतूक करण्यासाठी दिड लाखाची लाच घेतांना औरंगाबाद येथील अपर तहसीलदार किशोर देशमुख( मुळ रा.देऊळगाव बंडा, ता.रिसोड, जि.वाशिम, ह.मु. एन-3, प्राईड पार्क, वेदांतनगर, औरंगाबाद) यांना लाच घेताना अटक झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास हि कार्यवाई करण्यात आली आहे. तक्रारदार खाम नदी, शेंदुरवादा येथून शासनाची अधिकृत वाळु वाहतुकीचे काम घेतले होते. त्यांचे वाळू वाहतुकीचे दोन हायवा MIDC पोलिसांनी पकडले होते. रॉयल्टीच्या पावत्या ख-या कि खोट्या हे तपासणीसाठी पोलीस ठाणे यांनी पत्रव्यवहार केला होता. पावत्या ख-या आहे असा अहवाल पोलिसांना देण्यासाठी 3 लाख 20 हजार रुपये, शहर हद्दीत वाळुची वाहतूक करण्याची असल्यास 1 लाख 50 हजार लाचेची मागणी अपर तहसीलदार यांनी तक्रारदारास केली होती. सोमवारी रात्री एमटीडीसी, क्रांतीचौक रोड येथे रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक एस.एस.शेख, राजपूत, पोलीस अंमलदार ज्ञानदेव जुंबड, अनिल सानप, ज्ञानेश्वर म्हस्के, जावेद शेख, गणेश चेके, शिवाजी जमधडे, चालक प्रविण खंदारे यांनी केली आहे. आरोपी अपर तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पिसिआर मध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहे.