चिकसे – कणकवली येथील वाहतूक पोलीस कर्मचारी विश्वजीत परब व चंद्रकांत माने तसेच नगर पंचायत कर्मचारी प्रदीप गायकवाड हे कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. या जळीतकांडाचा निषेध करत घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांना जबर शिक्षा करावी. तसेच कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा तयार व्हावा यासाठी अखिल भारतीय पोलिस हद्द संरक्षक संघटनेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर व धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भावसार यांच्या मार्गदर्शनाने संघटनेच्या साक्री तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी साक्री तालुका अध्यक्ष तुषार देवरे, तालुका महिला अध्यक्ष वंदना खैरनार, शहर अध्यक्ष ललिता देवरे, पल्लवी देवरे चेतना ह्याळीस, वैशाली देवरे, शुभांगी भदाणे, प्रियंका मोरे आदी उपस्थित होते.
Home गुन्हेवार्ता कणकवलीतील जळीतकांडाच्या आरोपींना जबर शिक्षा द्या : पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे निवेदन