
चंद्रपूर :- काही वर्षा पूर्वी मोठा मुलगा गेला मात्र आईवडिलांचा एक मात्र आधार असलेला गोलू आज आई वडिलांना सोडून कायमचा गेला ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. इंदिरा नगर निवासी 27 वर्षीय गोलू परचाके यांचा आज अपघातात मृत्यू झाला. मात्र गोलू आपल्या आई वडील व बहिणी ला सोडून अत्यंत वेदनादायी परिस्थितीत सोडून गेला आहे.गोलू परचाके हा गॅस सिलेंडर कंपनीत वाहन चालक म्हणून काम करीत होता.आज वरोरा नाका चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर गोलू चे दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने गोलू रस्त्यावर घासत गेला, या घटनेत गोलुचा जागीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे वरोरा नाका चौकातील ह्या पुलाने अनेकांचे जीव घेतले, आज अनेक वर्षांनी त्या पुलावर घडलेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला.रामनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.