आंघोळीसाठी तलावात गेला अन् पाण्यात बुडून मेला

0
34

तिरोडा,दि.30 : आंघोळीसाठी तलावात गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 29 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील पुजारीटोला येथे घडली.धमेंद्र गणेश राऊत (वय 25 वर्ष) रा. पुजारीटोला असे मृत युवकाचे नाव आहे. तो गावाजवळील गावतलावामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडून मरण पावला.सुरेश दौलत राऊत (वय 41वर्ष) रा. पुजारीटोला यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार चेटुले, पोलीस शिपाई सपाटे करीत आहेत.