तिरोडा पोलिसांचे 3 दारू अड्ड्यांवर छापे

0
26

तिरोडा, दि. 31 : पोलिसांनी संत रविदास वॉर्डातील दोन पुरुष व एका महिलेच्या घरी अशा एकूण 3 अवैध दारू अड्ड्यांवर छापे मारून तब्बल 2 लाख 53 हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला. ही कारवाई रविवार, 30 मे रोजी करण्यात आली. सूरज प्रकाश बरियेकर (वय 35), धिरज प्रकाश बरियेकर (वय 32) व शिला विनोद खरोले (वय 40) दोन्ही रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा अशी आरोपींची नावे आहेत.पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या आदेशान्वये अधिनस्त पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की,

सूरज प्रकाश बरियेकर (वय 35) रा. संत रविदास वॉर्ड हा आपल्या राहत्या घरी हातभट्टीची अवैध दारू बाळगून विक्रीचा व्यवसाय करीत आहे. यावरू पोलिसांनी त्याच्या घरी छापा घातला. मात्र पोलिसांना वर्दीत बघून तो पळून गेला. त्यामुळे शेजारच्या लोकांना त्याचे नाव विचारून पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांच्या नवीन बांधकाम असलेल्या घराच्या खोलीत 105 प्लास्टीक पोतडीत प्रत्येकी 20 किलो याप्रमाणे 2100 किलो सडवा मोहापास प्रती 80 रुपये किलोप्रमाणे 1 लाख 68 हजार रूपयांचा माल अवैधरित्या आढळला. सदर माल पोलिसांनी कायदेशीररित्या ताब्यात घेतला. ही कारवाई सकाळी 7.15 ते 8.10 वाजता दरम्यान करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सूरज प्रकाश बरियेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल केला.
यानंतर दुसर्‍या कारवाईत अवैधरित्या हातभट्टीची दारू बाळगून आपल्या घरी विक्रीचा व्यवसाय करणारा धिरज प्रकाश बरियेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरी पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन छापा मारला. मात्र पोलिसांना वर्दीत बघून तो मागील दाराने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, पण तो मिळाला नाही.

त्यामुळे पोलिसांनी शेजारच्या लोकांना त्याचे नाव विचारले व त्याच्या घराची हातभट्टीच्या दारुबाबत झडती घेतली. त्यावेळी घराच्या मागील खोलीत बाथरूमजवळ 35 प्लास्टीक पोतडीत प्रत्येकी 20 किलोप्रमाणे 700 किलो सडवा मोहापास प्रती 80 रुपये किलोप्रमाणे 56 हजार रुपयांचा माल आढळला. पोलिसांनी सदर माल जप्त केला. ही कारवाई सकाळी 8.30 ते 9.10 वाजतादरम्यान करण्यात आली.पोलीस शिपाई विदेश अंबुले यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रकाश बरियेकर (वय 32) रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलाम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तिरोडा पोलिसांचे 2 दारू अड्ड्यांवर छापे : एक पुरुष व एका महिलेच्या घरून 85 हजारांचा सडवा रसायन जप्त
Police raid illegal liquor dens 2

त्यानंतर पुन्हा गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी लगेच तिसरी कारवाई केली. संत रविदास वॉर्डातीलच शिला विनोद खरोले हिच्या घरी दोन पंचांना सोबत घेऊन छापा मारला. ती घरी असल्याने तिला येण्याचे कारण सांगून हातभट्टीच्या दारुबाबत घरझडती करायचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र तिने नकार दिला. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती केल्यावर तिच्या घराच्या मागील खोलीत 18 प्लास्टीक पोतडीत प्रत्येकी 20 किलोप्रमाणे 360 किलो सडवा मोहापास रसायन प्रती किलो 80 रुपयेप्रमाणे एकूण 28 हजार 800 रूपयांचा माल अवैधरित्या आढळला. पोलिसांनी सदर माल जप्त केला. ही कारवाई सकाळी 9.30 ते 10.15 वाजता दरम्यान करण्यात आली.