येवलीच्या मंडळ अधिकार्‍यास १ हजाराची लाच घेताना अटक

0
18

गडचिरोली- सर्वे नं. १२७/ब शेतजमिनीचे फेरफार तक्रारीचे नावे करण्याचे कामासाठी तक्रारदाराकडून १ हजाराचा लाच घेणार्‍या येवलीच्या मंडळ अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. सदर कारवाई आज १ जून रोजी करण्यात आली. गिरीधर धानुजी सोनकुसरे (५७) असे लाचखोर मंडळ अधिकार्‍याचे नाव आहे.
तक्रारदार हा वाकडी येथील शेतकरी असून त्यांनी सर्वे नं. १२७/ब शेजमिनीचे फेरफार तक्रारीचे नावे करण्यासाठी येवली येथील मंडळ अधिकार्‍याकडे गेले असता आरोपीने तक्रादाराकडे २ हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडींत तक्रारदार १ हजार रूपये देण्याचे मान्य केला. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १ जुन रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली. त्यात मंडळ अधिकारी पंचसाक्षीदारांसमक्ष लाचेची सुस्पष्ट मागणी केली. त्यानुसार आज लावलेल्या सापळय़ात मंडळ अधिकारी गिरीधर सोनकुसरे हे चाल घेताना अलगद अडकले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, पोहवा प्रमोद ढोरे, नथ्थु धोटे, पो.ना. सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोशि गणेश वासेकर, किशोर ठाकूर, महेश कुकुडकार, चापोशि घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.