
गोंदिया,दि.09– परराज्यात बलात्काराचा गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या ३ आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.राजेश मंडल वय 21 वर्ष, राधेश्याम मंडल वय 24 वर्ष व विजय मंडल वय 20 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत झारखंड राज्यातील देवीपुर पोलिसात या आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे.तिघेही जण झारखंड राज्यातील देवीपुर हद्दीजवळील सिरी या गावातील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर देवीपुर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद आहे.झारखंड राज्यातील देवीपुर पोलिसांनी गोंदिया रेल्वे पोलिसांना फोनद्वारे, त्यांच्या देवीपुर पोलिस स्टेशन मध्ये पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद असलेले 3 आरोपी हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने टाटानगर येथून सूरत गुजरात कड़े पळून जात असल्याची माहिती दिली. त्यांचा शोध घेत त्यांना गाड़ी खाली उतरवून ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. सूचना मिळताच गोंदिया रेल्वे पोलिसांनी संबधित गाडी गोंदिया रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येताच आरोपींचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या.या तिन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना झारखंड पोलिसांकडे सुपर्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. गोंदिया रेल्वे पोलिसांच्या समय सूचकतेमुळे मोठ्या गुन्ह्यातील या तिघाही नराधमांना अटक करणे सहज शक्य झाले