
अर्जुनी-मोरगाव, दि.10 : तालुक्यातील अरततोंडी येथील लीलानंद आनंदराव तरोणे हे अर्जुनीच्या बरडटोली निवासी कावळे गुरुजी यांच्या घरी टाईल्स फिटिंगचे काम करीत होते. दरयन घरासमोर ठेवलेली दुचाकी रविवार, 6 जून रोजी अज्ञात चोरट्यानी लांबवली होती. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी ही दुचाकी चोरणार्यांना 24 तासांत अटक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरोने यांनी हिरो कंपनीची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 35/एक्स 2690) चोरी गेल्याची तक्रार अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा क्रमांक 142/21 नुसार भादंविच्या कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता.सदर गुन्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया, अप्पर पोलीस अधीक्षक देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात गुप्त माहितीच्या आधारे बरडटोली येथील पवन परसराम नेवारे (23) व महागाव येथील जब्बार रफिक शेख (28) या चोरट्यांना दुचाकीसह सोमवार, 7 जून रोजी 24 तासाच्या आत अटक केली.
ठाणेदार महादेव तोदले यांच्या नेतृत्वात सपोनि प्रशांत भुते, पोलीस हवालदार यशवंत मडावी, पोलीस नायक रोशन गोंडाने, पोलीस शिपाई मोहन कुहीकर यांनी ही मोहीम फत्ते केली.