नेचर प्राईड रिसॉर्टवर पोलिसांची धाड,33 लाखांचा माल जप्त

0
69

भंडारा,-रावणवाडी येथील नेचर प्राईड रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 15 लोकांना ताब्यात घेतले. यांच्याकडून जवळपास 33 लाख रुपया चा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या रावणवाडी येथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल आणि रिसॉर्ट उभारण्यात आले आहेत. दरम्यान टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील इतर हॉटेल आणि पर्यटन स्थळ बंद असताना नेचर प्राईड रिसॉर्ट मध्ये मात्र पर्यटकांची म्हणजेच नागरिकांची सुरू असलेली ये-जा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय होता.
या रिसोर्टमध्ये जुगार भरविला जात असल्याची ची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांना कारवाईचे निर्देश दिले. 9 जूनच्या रात्री रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकली. जुगार सुरू असल्याचे उघड झाले यावेळी मोरेश्वर टेनीचंद सोरते वय ४७ वर्ष मौदा , रमेश नत्थुजी पराडकर वय ३५ वर्ष रेशीमबाग नागपुर, प्रशांत केशवराव ढेंगरे वय ५४ वर्ष नागपुर , राधेशाम तेजराम निनावे वय ४६ वर्ष मौदा, रविन्द्र विठ्ठलराव सवाईतुल वय ३९ वर्ष नागुपर, महेश भैय्याजी बरगट वय ३८ रामटेक, अक्षय कैलास अडीकने वय २४ नागपुर, अभय विजय जाधव वय ३९ वर्ष नागपुर, कमलेश ओमप्रकाश कावळे वय ३१ वर्ष मौदा, अतुल उत्तम रामटेके वय ३१ भंडारा , नरेश बबनराव तिडके वय ३५ वर्ष पवनी, परमानंद राकडु नंदेश्वर वय ४८ वर्ष सलेभटा, अश्विन कुलदिपक मेश्राम, वय २४ पवनी, प्रविण देवदास टिल्लु वय ४० वर्ष नागपुर, सुखदेव श्रीराम मस्के वय ४१ वर्ष रा.गडेगाव जि.भंडारा यांना ताब्यात घेत त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईत 34 लाख 77 हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तपासात आणखी मोठे नामांकीत व्यावसायीक पुढे याण्याची शक्यता आहे. कारवाई दरम्यान आणखी बरेच काही हाती लागल्याची माहिती आहे. मात्र काही गोष्ठी पुढे आल्या नसल्याची चर्चा आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस उप निरीक्षक विवेक राऊत, रविन्द्र रेवतकर, पोलीस हवालदार धमेन्द्र बोरकर, गेंदलाल खैरे, तुळशीदास मोहरकर, विजय राऊत, पोलीस नाईक गौतम राऊत , सतीश देखमुख , कैलास पटोले , राजु दोनोडे, प्रशांत कुरजेंकर तसेच पोलीस शिपाई स्नेहल गजभिये, संदीप भानारकर, सुमेध रामटेके, प्रशांत कुरंजेकर चालक पो.ना सचिन खराबे, महीला पो.शि.दिपाली चवळे, ज्योती रामटेके, माधुरी चवळे आदींनी केली आहे.