
अकोला-शहरातील एका दारु विक्रेत्याकडून लाच घेताना रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या ठाणेदाराचे लेखनिक गणेश पाटील याला 27 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. दारु विक्रेत्याने या विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दारु विक्रेत्यांकडून हप्ता गोळा करणार्या काही पोलिसांना आज मोठा दणका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने बसला आहे. रामदास पेठ पोलिस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन परिसरात सर्रास दारू विक्री होते. याकडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष असून ते का आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
बड्या हॉटेल चालकांनी या परिसरात अवैध दारु विक्री सुरु केली आहे. त्याच बरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात नियमबाह्यपणे दारू विक्री, दुकाने, भोजनालय सुरु असतात. अशा एका दारु विक्रेत्याला 27 हजारांची मागणी करणार्या ठाणेदाराच्या लेखनिकाला संबंधित दारु विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहानिशा केल्यानंतर ही सापळा कारवाई करण्यात आली. गणेश पाटील यांनी दारु विक्रेत्याला सत्तावीस हजारांची लाच मागितली. त्या विषयाची शहानिशा केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत गणेश पाटील याला रंगेहात लाच घेताना अटक करण्यात आली.