पोलीस वाहनचालकाच्या हत्येने पोलीस विभागात खळबळ

0
60

गडचिरोली.दि 05ः-पोलीस वाहनचालकाची अज्ञातानी धारदार चाकूने गळा कापून हत्या करण्यात आल्याची घटना नागेपल्ली येथील वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये समोर आली. या हत्येने परिसरात व पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

जगन्नाथ सिडाम (53) असे हत्या झालेल्या पोलीस वाहनचालकाचे नाव आहे. ते भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत होते. काल रात्रौ ते नागेपल्ली येथील आपल्या राहत्या घरी झोपेत असताना अज्ञात मारेकरूने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले. व काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना चंद्रपुर येथे उपचारासाठी नेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनास्थळ अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी, विशाल ठाकुर, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे हे श्वान पथकासह दाखल झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.