
आमगाव– तालुक्यातील बोरकन्हार येथील जिप शाळेत कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, 5 जुलै रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे घडली. जिप शाळेत कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे यांनी आज पहाटे 5 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मृतदेह रिसामा येथील राधा-कृष्ण मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत पाणी काढण्यासाठी असलेल्या गिरणीला दोरखंडाने गळफास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह अढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मुटकुरे हे नम्र स्वभावाचे होते, इंग्रजी विषयात निपुण होते, झाडांवर कलम करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा,मुलगी, पत्नी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले असून पो. स्टे. आमगाव येथे मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.नाळे यांच्या मार्गदर्शनात स.फौ.कन्नमवार करीत आहेत.