तिरोडा : तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील आणि खुल्या जागेतील विहिरींवर लावलेल्या इलेक्ट्रिक मोटरपंप चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अशा चोरीच्या घटना अधिक वाढल्या आहेत. पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात मोटरपंप चोरी करणार्यास अटक करण्यात आली (Motor pump thief arrested) असून त्याच्या जवळून एकूण 5 मोटरपंपसह 26 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, 08 मे 2022 पोलीस निरीक्षक योगेश पारधी हे पोलीस अंमलदारासह परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काचेवानी येथील 2 गुन्हेगार मोटरपंप विकण्याकरिता खैरबोडी गावात फिरत आहेत. या माहितीवरून नामे प्रवीण चैनलाल चौधरी रा. काचेवानी आणि 1 विधीसंघर्ष बालक यांना अधिक विचारपूस करण्यात आली. त्यावेळी त्यांनी दिलेल्या कबुलीवरून शेतातील तणशीमध्ये आणि घरझडतीत खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आलेला आहे.1)एक समरसिबल मोटर पंप किंमत 15000/-रुपये.(2)3 नग हिरव्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर किं. 9000/-रुपये.(3)1नग निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर पम्प किं 2000/- रुपये असा एकूण 26000/-रुपये चा मुद्धेमाल जप्त केलेला आहे.सदर इलेक्ट्रिक मोटरपंप कुठून चोरून आणले याबाबत आरोपींनी रोहित बबनदास चौधरी रा. काचेवानी यांच्या फकीरटोली येथील आदिशक्ती पब्लिक स्कूलच्या नवीन बांधकामावरील चोरी केल्याचे सांगत आहेत. इतर मोटारी पालडोंगरी, भोम्बोडी, सरांडी परिसरातून चोरी केल्याचे सांगत आहेत. सदर गुन्हेगाराकडून आणखी मोटरपंप चोरीचे गुन्हे उघड होणार आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सोबत पोलीस हवालदार भाटिया, बावणे, मुकेश थेर, पोलीस शिपाई दमाहे, सपाटे, अंबुले, पंकज सवालाखे यांनी केलेली आहे.