धारणीत भीषण अग्नीतांडव 70 लाखाचे नुकसान

0
12

अमरावती दि.4-जिल्ह्यातील धारणी शहरातील जुन्या वस्तीतील वार्ड क्रमांक 10 मधील महेश व जगदीश मालवीय यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. आगीत 70 लाखापेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.
धरणी शहरातील महेश व जगदीश मालवीय यांच्या पुरातन मोठ्या घरात अचानक गुरुवारी रात्री साठेआठ वाजताचे आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. घरातील फर्निचर, धनधान्य, किराणा साहित्य आगीमुळे बेचिराख झाले. नगरपंचायतचे अग्नीशमन वाहन मोक्यावर उशीरा पोहचले. मात्र प्रशिक्षित कर्मचारी, चालक व मदतनीस नसल्यामुळे सीढी लावून आगीपर्यंत कोणीच पोहचू शकले नाही. फक्त दूर अंतरावरुन पाणी फेकण्यात आल्याने लाभ झालेला नाही. खासगी टँकरद्वारे आगीवर नियंत्रण करणे सुरु होते. दरम्यान हजारोची गर्दी मोक्यावर जमा झाल्याने पोलिस अचानक हरकतीत आले आहे. मोक्यावरुन जनतेला दूर राहण्याची विनंती पो.नि. बेलखेडे यांनी केल्यावर स्थिती नियंत्रणात आली. मालवीय यांच्या घराच्या वर्‍हाड्यांत 100 पोते धान्य होते. याच घराला लागून असलेल्या मुलचंद मालवीय, जयदेव मालवीय तथा हरिओम बनसोड व त्यांच्या कुटूंबातील इतर भाऊंच्या घराला धोका निर्माण झाला आहे. धारणी नगरपंचायतचे नियोजन फसलेले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून अध्यापक आटोक्यात आलेली नाही दरम्यान या आगीमुळे सुमारे 70 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे