विद्युत खांबावरुन पडुन मजुराचा मृत्यू

0
72

टाकला – हरदोली शिवारातील घटना.

✍️विपुल.एम.परिहार/मोहाडी,दि.11ः तुमसर तालुक्यातील टाकला- हरदोली येथील शेतकऱ्याच्या शेतावर विद्युत कनेक्शनसाठी नव्याने सिमेंट काँक्रिटचा विद्यूत खांब उभारून विद्युत लाईनचे कनेक्शन करत असतांना विद्युत खांब अर्धवट तुटन पडल्याने मजुराचा खांबावरुन खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शेतशिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यालगत ११ जून रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.मृत मजुराचे नाव राजु उरकुडा धार्मीक (४५) रा.खरबी असे आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील हरदोली -टाकला शेतशिवारात बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यालगत असलेल्या शेतशिवारात मोहाडी येथील कमलेश गभने नामक इलेक्ट्रिक कंत्राटदाराचे काम सुरु होते.त्या कामांतर्गतच टाकला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा करण्यासाठी नव्याने विद्यूत खांब उभारून लाईनचे काम करण्यासाठी खांबावर चढलेला खरबी येथील कामगार राजु उरकुडा धार्मीक खांबावरुन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहीती मिळताच आंधळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळावर पोचत मृतदेह ताब्यात घेत  शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले.शवविच्छेदनानंतर मृतक राजुच्या पार्थिवावर खरबी येथील स्थानीक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतक मजुर राजु धार्मीक यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. आता राजुचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या दोन्ही लहान मुलांचे मातृ -पितृ छाया हरपल्याने पोरके झाले आहेत.मृतक राजुच्या अपघाती निधनानामुळे संबधित इलेक्ट्रिक कंत्राटदाराकडुन आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांच्या कुटुबियांनी केली आहे.