अर्जुनी मोरगाव,दि.13 -वडसा कोहमारा राज्यमार्गावरील देवलगाव जवळ दोन वाहने आपसात भीडली.या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार वडसा कोहमारा राज्यमार्गावरील देवलगाव नजीक कोंबडी वाहतूक करणारा मिनी ट्रक आणि झायलो गाडी आमने सामने धडकल्याने या दुर्घटनेत एकाच परिवारातील नऊ जण जखमी झाले तर मिनी ट्रक मधील क्लिनर किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारच्या पहाटे साडेपाच वाजता घडली.घटना घडल्यानंतर जखमी बराच वेळ रस्त्यावर पडून होते. जखमींमध्ये नानू निषाद 34, हंसराज निषाद 28,सतीदेवी निषाद 21,सोमी निषाद 40, राजूलिया निषाद 55 आणि अन्य चार जखमींचा समावेश आहे. या दुर्घटनेत GJ 05 JM 7867 या झायलो गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. कोंबडी वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रक वरील कोंबड्यांनी भरलेला कंटेनर वाहनापासून खंडित झाला.जखमींना नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सदर माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस घटनास्थळी दाखल झाले.