
गडचिरोली-गोवंश तस्करी करणारे काही तस्कर हे गडचिरोली जिल्ह्रातील स्थानिक शेतकर्यांकडून जनावरे खरेदी करून त्यांना मालवाहू वाहनात निदर्यतेने भरून कत्तली करीता दुरवरील शहरात विक्री करीता घेवुन जात असतात. अशा तस्करावर पायबंद घालण्यासाठी पोलिस दलाच्यावतीने १८ ऑगस्टला पुराड-कुरखेडा व १९ ऑगस्ट रोजी गट्टा (फु) या दोन वेगवेगळ्या मार्गावर नाकाबंदी करून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची तस्करी करणार्या १४ ट्रकमधील एकूण ४0३ गोवंश जनावरांची सुटका केली.
१८ ऑगस्ट रोजी पुराडा ते कुरखेडा मार्गे गोवंश तस्कर कत्तलीकरीता जनावरे १0 ते १२ ट्रकमध्ये तस्करी करीत असल्याची माहिती कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांना मिळाली. यावरून त्यांनी कुरखेडा जवळील गोठणगाव फाटा वन नाका येथे नाकाबंदी करून सापळा रचून कत्तलीसाठी वाहतुक करणारे ९ ट्रक पकडून त्यातील २७८ जनावरांची मुक्तता करण्यात आली.
दुसर्या घटनेत शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी रोजीचे १ वाजता कत्तलीकरीता जनावरे ट्रकमध्ये कोंबुन बोटेझरी मार्गे येत असल्याबाबत पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी मयूर भुजबळ यांना मिळाली. यावरून पोलिसांनी गट्टा (फु.) मार्गावर नाकाबंदी करून कत्तलीसाठी वाहतुक करणारे ५ ट्रक फुलबोडी येथे पकडून एकूण १२५ जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. दोन्ही कारवाईमध्ये गोवंश वाहतुक करणार्या सहा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे. दोन्ही घटनेत एकूण १४ ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यात आले असून, एकूण ४0३ गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
सदर कारवाई कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर, सपोनि दिनेश गावंडे, अंमलदार राकेश पालकृतीवार, नरेश अत्यालगडे, जितेंद्र कोवाची, मनोज राऊत, रूपेश काळबांधे व पेंढरी येथील कारवाई करीता उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ, पोउपनि गजानन सोनुने, नापोशि/विलास कुमरे, नापोशि/संदीप बागळे, पोशि/नितेश कढव, पोशि/शरद जाधव यांनी केली.