
भंडारा : पवनी तालुक्यातील निलज मार्गावरील गोसेखुर्द उजवा कालवा येथे आंघोळ करण्यासाठी गेलेले नागपुरातील दोन तरुण वाहून गेले. नईम खान लाल खान (२२) व आमिन शहा लाल शहा (२२) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. नईम आणि आमिन हे दोघेही अब्बुमिय्या नगर, भांडेवाडी, नागपूर येथील रहिवासी आहेत. गावोगावी जाऊन कपडे विक्री करण्याचे काम ते करतात. त्यानिमित्त दोघेही येथे आले होते. दरम्यान, आंघोळीसाठी ते कालव्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.