दासगाव येथे मुलीला घेऊन दोन युवकांत निघाला देशीकट्टा?

0
143

गोंदिया,दि.02ः- गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसून येत असून देशीकट्टयाचा वापराचेही प्रमाण वाढल्याचे अनेक घटनांवरुन समोर आले आहे.यातच आज शुक्रवारला 2 सप्टेंबर रोजी तालुक्यातील दासगाव येथील एका चौकात एका शाळकरी मुलीला घेऊन दोन युवकामध्ये वाद होऊन देशीकट्टा निघाल्याची चर्चा समोर आली आहे.दासगाव येथील एका खासगी हायस्कुलमध्ये शिकत असलेल्या एका मुलीवर गावातील व गावाशेजारील दुसर्या गावातील एक युवक एकतर्फी प्रेम करीत असल्याची चर्चा असून त्या दोन युवकामध्ये ती आपली यावरुन वाद होऊन त्यापैकी एकाने देशीकट्टा काढून धमकावण्याचा प्रकार केल्याची चर्चा आहे.याप्रकरणात अद्याप कुठलीही पोलिस तक्रार झालेली नसून घटनेच्यावेळी संबधित मुलगी ही शाळेत असल्याचेही बोलले जाते.दासगाव येथील नागरिकात हा चर्चेचा विषय झाला असून गावापर्यंत देशी कट्टा पोचल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.