
अर्जुनी मोर-अर्जुनी मोर तालुक्याला लागून असलेला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कन्हारगाव येथील तेजराम बकाराम कार(वय 42) हा शेतकरी एफडीसीएमच्या वडेगाव बिटाला लागून असलेल्या आपल्या शेतात आज 30 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास गेला असता सीटी 1 या वाघाने ठार केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी आर.ए.गावित तसेच एफडीसीएम अर्जुनी मोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.यु.कायते घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.तसेच मृताच्या पत्नीला तात्पुरती मदत म्हणून वीस हजार रुपये वनविभागाच्या वतीने दिले.