मुले चोरणारी टोळीतील लोकांना पोलिसांनी केले गजाआड

0
106

गोंदिया, ता. ७ ः मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा असतानाच शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ च्या सुमारास सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात अनोळखी किंबहुना
संशयितरित्या फिरणाऱ्या चार जणांना रहिवाशांनी चांगलाच चोप दिला. गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या चारही जणांना ताब्यात घेतले आहे.

सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी काही अनोळखी व्यक्ती टोळक्याने फिरत होती. या टोळक्यातील काही व्यक्तींनी गुरुवारी याच परिसरातून एका मुलाच्या
अपहरणाचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलाने आणि स्थानिक नागरिकांनी समयसूकता दाखविल्याने हा प्रयत्न फसल्याचे बोलले जाते. दरम्यान, याच टोळक्यातील चार पुरुष व काही
महिला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसले. या लोकांना त्या मुलाने आेळखले. ही माहिती त्याने स्थानिकांना देताच त्यांनी घटनास्थळ
गाठून चाैघांची चांगलीच धुलाई केली. तथापि, या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित चाैघांनाही
ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चाैकशी केली जात आहे. या घटनेने मात्र, शहरात खळबळ उडाली आहे.

सावराटोली परिसरात घडलेली घटना ही खरी आहे. या घटनेतील चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांची चाैकशी सुरू आहे.
-चंद्रकांत सूर्यवंशी, ठाणेदार, गोंदिया शहर पोलिस ठाणे.