अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्या इसमास अटक

0
38

गोंदिया,दि.15ः-जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशाननुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ नोव्हेंबरला केलेल्या कारवाईत अवैधरित्या हत्यार बाळगणार्या इसमास अटक केली आहे.रामनगर पोलीस ठाणेंतर्गत रेलटोली परिसरात स्थानिक गुन्हे शाखे सपोनी विजय शिंदे, पोलीस हवालदार राजू मिश्रा व पथकाने अवैध्यरित्या शस्त्रे बाळगून निर्मल शाळेजवळ विकत असल्याची माहिती मिळताच छापा मारुन सदर इसमास ताब्यात घेण्यात आले. चमकोरसीग स्वर्णसिंग सिंग वय ५४ वर्ष, रा. क्लेजर उत्तर जिल्हा तामतरन (राज्य पंजाब) पोलीस थाना बिटावा असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.त्याने लावलेल्या दुकानातील टेबलाचे खाली एका पांढ-या रंगाच्या प्लास्टीक पोत्यात गुंडाळून ठेवलेल्या 15 तलवारी, 7 गुप्त्या, 7 चाकू अशी घातक हत्यारे आढळून आली.सदर इसमाकडे शस्त्र बाळगण्याबाबत कसलेही कागदपत्रे, परवाना नसल्याने जिल्हाधिकारी यांचे अधिसूचनेतील अटींचे उल्लंघन केल्याने अवैध शस्त्रे बाळगल्या प्रकरणी कारवाई करून सदर इसमा विरुद्ध पो.स्टे. रामनगर येथे अपराध क्रमांक 263/22 भारतीय हत्यारे कायदा कलम ४,२५ अन्वये तसेच मुंबई पोलीस कायदा सन १९९१ कलम १३५ शिक्षा कलाम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,यांचे निर्देशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे आदेशान्वये स्था.गु.शा. प्रभारी पो.नि. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पथक सपोनी. विजय शिंदे, यांचे नेतृत्वात पो.हवा. राजेंद्र मिश्रा/ ९१९ , पोहवा महेश मेहर/९५, पो.हवा. देखमुख / १२७७, पो. हवा. चित्तरंजन कोडापे / १२८३ यांनी कारवाई केली आहे.