अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावसाची शिक्षा

0
41

गोंदिया,दि.23ः– जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या झिलमिली शिवारात चिरामणटोला येथील आरोपी युवकांनी अल्पवयीन 17 वर्षीय शाळकरी मुलीला एकेरी प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.यात त्याला अपयश आल्याने आरोपी दुर्गाप्रसाद गणेश रहागंडाले(वय 21) या युवकाने 23 फेबुवारी 2022 रोजी सायकांळी 4.30 वाजेच्या सुमारास शिकवणी वर्ग आटोपून घराकडे जात असलेल्या दासगाव येथील मुलीला वाटेत अडवून  लोखंडी हातोड्याने वार करुन जिवानिशी ठार मारले होते.या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रकरणाचा निकाल 22 डिसेंबर 2022 रोजी लागला असून क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीस गोंदिया जिल्हा सत्र न्यायाधीश-2 एन.बी. लवटे यांनी मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.विशेष म्हणजे अवघ्या 11 महिन्यात या प्रकरणाचा निकाल लावण्यात आला आहे.
सविस्तर असे की, घटना ता. वेळ-23/02/022 चे 16/30 वा. दरम्यान घटना ठिकाण – चिरामन टोला येथे आरोपी नामे- दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले वय 21 वर्षे रा. चिरामनटोला याने मयत अल्पवयीन मुलगी ही चिरामनटोला ते कामठा मार्गे ट्युशन क्लास ला जात असता नी ग्राम झीलमिली शेत शिवारात मुलीला एकटी बघून आरोपी याने तीला रस्त्यात अडवून तिच्या डोक्यावर लोखंडी हाथोड़या ने वार करून जीवानीशी ठार मारुण,स्वत:च्या गळ्यावर व मनगटावर ब्लेड नी कापुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाणे रावणवाडी येथे अल्पवयीन मयत मुलीचे काका श्री. लोकेश राधेलाल हरिंखेडे रा.चिरामन टोला यांचे तक्रारी वरुन आरोपी नामे-दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले वय 21 वर्षे रा. चिरामनटोला याचे विरुद्ध अपराध क्र.- 31/ 2022 कलम- 302, 309 भादवी अन्वये दिनांक- 23/02/022 चे 22/14 वा. गुन्हा नोंद करण्यात आले होते.

आरोपी- दुर्गप्रसाद रहांगडाले यांचे विरूध्द भक्कम साक्ष पुराव्या वरून युक्तिवाद ऐकल्यानंतर दोषसिध्द झाल्याने सत्रन्यायाधिश एन. बी. लवटे,यांनी आज दिनांक 22/22/2022 रोजी गुरूवारी *सत्र खटला क्रं. 70/ 2022 मध्ये मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.वरील प्रमाणे शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास पोलीस ठाणे रावणवाडीचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, यांनी केले. तर सरकार तर्फे सदर खटल्याचा युक्तीवाद जिल्हा सरकारी अभियोक्ता, सत्र न्यायालय गोंदिया  महेश चांदवानी, सरकारी वकील श्री.कृष्णा डी.पारधी यांनी केले.उत्कृष्ट तपासाबाबत निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक,अशोक बनकर ,अपर पोलीस अधिक्षक, सुनिल ताजणे उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांनी पोलीस स्टेशन रावनवाडी चे नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक  उद्धव डमाले यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.