कत्तलखान्याकडे जाणार्‍या ३0 जनावरांची सुटका

0
20

सडक अर्जुनी- तालुक्यातील पळसगाव-डव्वा मार्गावरील जांभळी फाट्यावर नाकाबंदीदरम्यान डुग्गीपार पोलिसांनी अवैधरित्या कत्तलखान्याकडे वाहतूक करणार्‍या वाहनातून ३0 जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी १३ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत अवैधरित्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणार्‍यांविरोधात विशेष पथकाद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २४ डिसेंबर रोजी विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डुग्गीपार पोलिसांनी पळसगाव-डव्वा मार्गावरील जांभळी फाटा येथे रात्रीदरम्यान नाकाबंदीदरम्यान एम. एच. ४0 / बी. एल. ६0४७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ३0 जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळले. याप्रकरणी कुंदन विदेशिलाल शहारे (वय ३१) रा. नागपूर व विनोद मंगरू शहारे (वय ४९) रा. नवेगाव बांध यांना ताब्यात घेऊन जनावरांना खैरी येथील सुकृत गौशालेत रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकसह १३ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींवर कलम ११(१) (ड) (ई) (ग) (फ) (ह) प्रा.नि.वा.का.१९६0, सहकलम २, ६, ९ महा. पशु.सं. अधि. १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस पथकामधील पोलिस अंमलदार सुजित हलमारे, पोहवा महेश मेहर, पोना शैलेषकुमार निनावे, पोशि सन्नी चौरसिया, दया घरत, पोशि हरिकृष्णा राव यांनी केली.