Home Top News आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात नक्षलवाद्यांची पुन्हा पत्रकबाजी तर गट्टा येथे वाहने जाळली

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात नक्षलवाद्यांची पुन्हा पत्रकबाजी तर गट्टा येथे वाहने जाळली

0

गडचिरोली : सूरजागड प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांनी धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. त्यावर आ. आत्राम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आता नक्षल्यांनी पुन्हा एकदा तीव्र आक्षेप घेत राज – परिवारावर बहिष्कार टाका, असे आवाहन पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. नक्षल्यांच्या पश्चिम विभाग समितीचा प्रवक्ता श्रीनिवास याने हे पत्रक काढले आहे.तर एटापल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत गट्टा येथे मध्यरात्री 23.45 ते 1 वाजेच्या दरम्यान 10-12 हत्यारबंद नक्षल्यानी रस्ता कामावरील मिक्सर मशीनला आग लावून जाळल्याची घटना घडली.

अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. २०१९ पूर्वी आ. आत्राम यांनी सूरजागड प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. निवडून आल्यावर त्यांनी यु-टर्न घेतला. त्या परिसरातील ग्रामसभा व गावकऱ्यांना विश्वासात न घेता स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला साथ दिली.

Exit mobile version