
गोंदिया,दि.14ः– जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने गोंदिया शहर पोलिसांनी चोरीला गेलेली मोटारसायकलचा शोध लावून चोराकडून ती जप्त करुन फिर्यादीस परत केले.सविस्तर असे की, 07/12/2022 रोजीच्या रात्री दरम्यान विद्यानगर, टि.बी. टोली गोंदिया येथील रहिवासी उदयराज प्रमोद कुलकर्णी यांची होंडा कंपनीची लिवो मो. सा. क्र. MH35-A-8173 कि. 40,000/-रु शिवशक्ती गारमेंट समोर उभी ठेवलेली असताना चोरी गेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्रं.777/2022 कलम 379 भादवि अन्वये दाखल करण्यात आला होता.त्या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यानंतर आरोपी श्रीकांत अरुण बोरकर(रा.देवरी)यांच्याकडून ती जप्त करण्यात आली.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटी करण पथकातील पोलीस अंमलदारांनी गोपनिय माहितीच्या आधारे सखोल तपास केल्यानंतर गुन्हयात चोरीस गेलेली होंडा कंपनीची लिवो मो. सा. क्र. MH35-A 8173 आरोपी नामे श्रीकांत अरुण बोरकर वय- २३ वर्षे रा. ता. देवरी जि. गोंदिया यांचेकडुन जप्त केली.सदर गुन्हयाचा तपास पो.ना. दिपक राहांगडाले ब.नं.318 पो.स्टे. गोदिया शहर यांनी केला असून सदर गुन्ह्यात जप्त मुद्देमाल मोटर सायकल मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी श्री.उदयराज प्रमोद कुलकर्णी वय ४८ वर्षे रा. विद्यानगर कॉलोनी टि.बी. टोली गोंदिया यांना दि.13/01/2023 रोजी पो. नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे उपस्थितीत पोलीस स्टेशनला सुपुर्दनाम्यावर देण्यात आलेली आहे.